कल्याण : कल्याण, डोंबिवली मध्ये कोव्हिडं रुग्णाची संख्या वाढत असल्याने रुग्णांना सुविधा मिळाव्यात म्हणून महापालिकेच्या वतीने 55 बेड ऑक्सिजन आणि 9 बेड आयसीयूचे कोव्हिड रुग्णालय आजपासून वसंत व्हॅली येथे सुरू करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णलयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की भविष्यात देखील सुविधा निर्माण करण्यात येतील महापालिकेतर्फे कोव्हिड रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेतर्फे स्क्रिनिंग,कॉन्टॅक्त ट्रेसिंग सह मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्ट ,आरटी पीसीआर टेस्ट वाढविण्यात आली आहे, तसेच राज्य सरकारचा एक महिन्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे त्याअंतर्गत घरात घरात महिन्यातुन दोनदा ज्या रुग्णांना इतर काही आजार आहेत त्यांची तपासणी करण्यात येईल ,या पूर्वी देखील मास्क स्क्रीनिग करण्यात आलि आहे आता पुन्हा एक महिन्याचा द्राइव्ह घेण्यात येणार आहे त्यात राज्य शासन आरोग्य विभाग ,लोकप्रतिनिधी सर्वाच्या सहभागाने हे राबवण्यात येणार आहे यामुळे रुग्णांच प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा दावा केला .
तसेच सर्वांच्या सहभागातून हे काम होतंय ,त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा विषय नाही ,सरकारचा विषय नाही,यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे ,या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची आपली जबाबदारी घेतली पाहिजे ,टेस्ट करून घेतल्या पाहिजेतनसे आवाहन केलं .तर राज्यात ऑक्सिजन ची कमतरता नाही ,राज्य सरकार कडून औद्यीगिक क्षेत्रात लागणारा ऑक्सिजन आणि कोव्हीड सेंटर ला हेल्थ ला लागणारा ऑक्सिजन या मध्ये 80 टक्के ऑक्सिजन हे कोव्हीड सेंटर ,हेल्थ वर आणि 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ऑक्सिजन चा तुटवडा भासणार नाही असे शिंदे बोलत होते.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या बाबतीत सातत्याने बैठका होत आहेत ,मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हाय कोर्टाने देखील मराठा आरक्षण व्हॅलीड ठरवलं होतं ,कायदा करून हे आरक्षण दिल होतं, सुप्रीम कोर्टाकडे घटना पिठाकडे जाताना त्याला इंटरिम स्टे दिलेला आहे. दुर्दैवाने ही मोठी घटना आहे. परंतु हे आरक्षण टिकलं पाहिजे ,यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री सगळ्याना विश्वासात घेत आहेत ,राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याशी मुख्यमंत्री बोललेले आहेत ,सर्वांनी हे मिळून एकजुटीने हा लढा देण्याची गरज आहे .मराठा आरक्षण टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार सर्वाना विश्वसात घेऊन सर्व प्रयत्न करेल असे शिंदे यांनी सांगितले.