ठाणे

बुश कंपनी येथील कोवीड१९ रूग्णालयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण : आता कोरोनाविरूद्धच्या लढाईला मिळणार बळ”

 ठाणे :- मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केलेल्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी”  ही मोहीम उद्यापासून संपूर्ण राज्यात राबविली जात असताना,या मोहिमेला आणि कोरोना विरूद्धच्या लढाईला अधिक बळ देणा-या ठाणे महापालिकेने उभारलेल्या बुश कंपनी येथील कोविड रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा आज नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय अंतर्गत बाळकुम-साकेत येथे पहिल्या विस्तारित १०४३ बेडची क्षमता असलेले कोविड रूग्णालय पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तब्बल २१ दिवसांत उभारण्यात आले होते.
मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते याआधी कोविड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्यानंतर दुस-या विस्तारित टप्प्यामध्ये वागळे प्रभाग समितींतर्गत बुश कंपनी येथे जवळपास ४९० बेडसची क्षमता असलेल्या कोविड रूग्णालयाची उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.मा. पालकमंत्री जातीने या रुग्णालयाच्या कामावर लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर महापौर नरेश गणपत म्हस्के हेही त्याचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. आज या रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ठाणे शहरामध्ये कोरोनाशी सामना करण्यासाठी या रूग्णालयामुळे मोठं बळ प्राप्त झालं आहे. शहरातील एकही व्यक्ती बेडपासून वंचित राहणार नाही,ही आमची भूमिका असून या रूग्णालयामुळे ठाणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे,असेही शिंदेसाहेबांनी यांनी यावेळी सांगितले.
महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा या वेळी म्हणाले की, पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाविरूद्धच्या लढाईत सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सक्षम असून,या रूग्णालयामुळे नागरिकांना नवीन सुविधा प्राप्त झाल्या आहेत. या रूग्णालयात एकूण ४४० बेडस् असून, यातील ३५० बेडस् हे ॲाक्सीजन बेडस् आहेत,तर साधे बेडसची क्षमता ९० इतकी आहे.उद्या दि.१५ सप्टेंबरपासून हे रूग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. याप्रसंगी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी मान्यवर उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!