१५ सप्टेंबर २०२० / आपले शहर टीम
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे के.व्ही.पेंढरकर महाविद्यालयामध्ये सन २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात बॅचरल ऑफ मल्टीमिडीया अॅड मास कम्युनिकेशन ( बी.एम.एस.),एम.ए.( इंग्रजी ), एम.ए.( अर्धशास्त्र ) या नवीन अभ्यासक्रमांकाना मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.तसेच बी.कॉम.अकाउंटिंग अॅड फायनान्स या विषयाच्या वाढीव तुकडीला मान्यता मिळाली आहे,या विषयांचे प्रवेश सुरु झालेले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आपली नावे महाविद्यालयामध्ये किंवा अधिक माहितीसाठी ७२०८५७३२११ या भ्रमणध्वनीवर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे