कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत दहिसर आणि ग्रामपंचायतमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ
ठाणे दि.१५ सप्टेंबर : कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत दहिसर आणि ग्रामपंचायत पिंपरी मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) डी. वाय.जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व घरांचे सर्वेक्षण करून कोणतेही घर सर्वेक्षणातून सुटणार नाही, याबाबत काळजी घेण्याची सूचना त्यांनी अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. यावेळी प्रतिज्ञा घेण्यात आली.
राज्य शासनाने कोव्हिडं १९ चे उच्चाटन करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे संशयित कोव्हिडं तपासणी, व उपचार, अति जोखमीचें व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोव्हिडं १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, रुग्णांचे गृहभेटीद्वारे संरक्षण, कोव्हिडं तपासणी आणि उपचार, आरोग्य शिक्षण, हे मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. श्री.जाधव यांनी मंगळवारी तालुक्याचा दौरा करत मोहीमेची अंमलबजावणी प्रभावी करण्याबाबत सुचना केल्या. सर्वेक्षण साहित्य व अहवाल नमुने पुरविण्याकामी संबंधित ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांना सूचित केले. तसेच य मोहीम यशस्वी करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नियोजनानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम कल्याण तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात येईल असा विश्वास श्री.जाधव यांनी व्यक्त केला.