डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण -डोंबिवलीतील पोलिसांना कोरोना आजार झाला की बरेच झगडावे लागते. त्यांच्यासाठी राखीव असलेली खाजगी रुग्णालय नेहमीच फुल असतात,तेथे बेड उपलब्ध होत नाही. मग पैसा खर्च करून खाजगी रुग्णालय गाठावे लागते, माझा अनेक पोलीस बांधवांचे हाल मी बघितले,.पण अशी परिस्थिती मुंबई पोलीस दलाची नाही.तेथे अश्या कोरोनाग्रस्त पोलिसांसाठी विशेष रुग्णालयांची व्यवस्था केली आहे.त्यांच्यासाठी व कुटुंबासाठी सुद्धा व्यवस्था आहे. त्यांच्यासाठी विशेष व जलद रुग्णवाहिका सेवा आहे.विशेष मदत कक्ष आहे.मग अशीच सेवा आमच्या कल्याण डोंबिवलीतील पोलिसांना का नाही…? त्यांना सुद्धा मुंबई सारखे उपचार मिळणे गरजेचे आहे, मग हा भेदभाव का? अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे मागणी केली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील पोलिसांना सुद्धा मुंबई पोलिसांसारख्या उपचाराच्या सोयीसुविधा उपलब्ध करा.. मनसेची मागणी
September 17, 2020
40 Views
1 Min Read

-
Share This!