भिवंडी : भिवंडीतील पटेल कम्पाऊंड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली असून यामध्ये २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी भिवंडी अ. केंद्राचे, ठाणे विभागाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे १५ जवान आणि राष्ट्रीय आपत्ती दलाची (एनडीआरएफ) एक तुकडी म्हणजेच ३० जवान उपस्थित असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंतच्या बचावकार्यात २५ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले असून आठ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आली आहे.
नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारी जिलानी इमारत (पटेल कम्पाऊंड) ही तीन मजली जुनी इमारत आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत १४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले आहे. त्यापैकी ८ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी आहेत. आम्ही स्वतः घटनास्थळी उपस्थित आहोत. येथे युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. भिवंडी तसेच ठाणे आपत्कालिन कक्षाचे कर्मचारी, रुग्णवाहिका, वाहतूक शाखेचे कर्मचारी, परिमंडळ २ मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने कार्यवाही चालू आहे.
– राजकुमार शिंदे, डीसीपी
दुर्घटनेतील मृतांची नावे
१) फातमा जुबेर बबू (महिला) – २ वर्ष
२) फातमा जुबेर कुरेशी (महिला) – ८ वर्ष
३) उजेब जुबेर (पुरुष) – ६ वर्ष
४) असका म. आबीद अन्सारी (महिला) – १४ वर्ष
५) अन्सारी दानिश म. अलिद (पुरुष) – १२ वर्ष
६) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पुरुष) – २२ वर्ष
७) सिराज अ. अहमद शेख (पुरुष) – २८ वर्ष
८) जुबेर कुरेशी (पुरुष) – ३० वर्ष
दुर्घटनेतील जखमींची नावे –
१) मोमीन शमिउहा शेख (पुरुष) – ४५ वर्ष
२) कौंसर सीराज शेख (महिला) – २७ वर्ष
३) रुकसार जुबेर शेख (महिला) – २५ वर्ष
४) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पुरुष) – १८ वर्ष
५) जुलैखा म. अली. शेख (महिला) – ५२ वर्ष
६) उमेद जुबेर कुरेशी (पुरुष) – ४ वर्ष