डोंबिवली ( शंकर जाधव ) : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने पोलीस भरतीचा निर्णय स्थगित करावा ,असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या ठाणे जिल्हा व शहर शाखेच्या वतीने, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदर स्थगिती नाही झाल्यास, आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सतीश देसाई ,महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवश्री दत्ता चव्हाण, ठाणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुभाष गायकवाड, ठाणे महानगर अध्यक्ष समीर देसाई, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष गवळी, पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षण निर्णयापर्यंत पोलीस भरती स्थगित करा.. संभाजी ब्रिगेडची मागणी..
September 21, 2020
51 Views
1 Min Read

-
Share This!