ठाणे

भिवंडी : इमारत दुर्घटना एकूण 39 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी असून 10 जणांचा शोध सुरु

ठाणे (संतोष पडवळ)  : भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 39 जणांचा बळी गेला असून, 25 जखमींना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही किमान 15 ते 20 जण अडकून पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ, टिडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनच्या तुकड्या घटनास्थळी बचावकार्य करीत असून, मंगळवारपासून जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने येथील ढिगारा हलविण्याचे काम सुरु झाले आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही इमारत कोसळली होती.

ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींची नावे..

  • हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
  • रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
  • मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
  • शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
  • मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
  • कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
  • रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
  • अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
  • आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
  • जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
  • उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)
  • आमीर मुबिन शेख (पु/१८ वर्ष)
  • आलम अन्सारी (पु/१६ वर्ष)
  • अब्दुला शेख(पु/८वर्ष)
  • मुस्कान शेख(स्री/१७वर्ष)
  • नसरा शेख(स्त्री/१७वर्ष)
  • इंब्राहिम(पु/५५वर्ष)
  • खालिद खान(पु/४० वर्ष)
  • शबाना शेख(स्त्री/५०वर्ष)
  • जारीना अन्सारी (स्त्री/४५)
  • मोबिन शेख़ (पु/४६ वर्ष)
  • सायमा इब्राहिन शेख़ (पु/१७ स्त्री)
  • आयाम इब्राहिन शेख़ (पु/७ वर्ष)
  • रूक्सा सलमानी (स्त्री/२० वर्ष)
  • उक्सा सलमानी (स्त्री/०४वर्ष)

दरम्यान, तर दुसरीकडे या घटनेला मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याची चर्चा कालपासून रंगली असतानाच, मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांच्यासह कनिष्ठ अभियंता दुधनाथ यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्याचबरोबर या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका स्तरीय चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या सात दिवसांमध्ये या घटनेसंदर्भात संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी या समितीला दिले आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!