डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणाचे आदेश असले तरी त्याच्या कार्यालयात योग्य आरोग्य सुविधा पुरविण्याकडे सरकारने देण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून आले. केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सुरक्षा रक्षक काम करत असताना कोरोना काळात त्यांना आवश्यक आरोग्य सेवेचे साहित्य अद्याप दिले गेले नसल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले.
सॅनेटाझरची, साफसफाई हे आजच्या या गंभीर परिस्थितीत अत्यावश्यक झाले आहे. पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाकडे अनेक वेळेला पालिका प्रशासनाने दुर्लक्षित केल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र अश्या परिस्थितीतही प्रशासन लक्ष देत नसल्याने येथील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत.वास्तविक सरकारी कार्यालयात काम करताना कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या आरोग्य सेवेकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.पालिकेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर असून त्यांच्याकडून चुका झाल्यास त्यांना वरिष्ठांचे बोलणे ऐकावे लागते.मात्र प्रशासनाच जर त्यांच्याबाबत चुकत असेल तर प्रशासनाला जाब कोण विचारणार असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे.सुरक्षा रक्षकांना प्रशासनाने आजवर सॅनेटाझरची सोय उपलब्ध करून दिली नाही. तसेच सुरक्षा रक्षक कार्यालयात साफसफाई योग्य होत नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांकडे अश्या प्रकारे प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचे प्रशासनाच्या याकामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.