महाराष्ट्र

पुरात वाहून गेलेल्या महिलेच्या कुटूंबाचे सांत्वन : शिवसेनेने दिला मदतीचा हात. 

‘ त्या’ नाल्यावर पुल बांधण्याचे आश्वासन. 
 मोखाडा ( दीपक गायकवाड ) – मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथील देवीचा नाला ओलांडताना अचानक पुर आल्याने वनिता पादिर  ( 35 ) ही वाहुन गेली होती. तीचा मृतदेह दुसर्या दिवशी सापडला. या पीडीत कुटूंबाची मोखाडा पंचायत समिती च्या सभापती सारिका निकम, तहसीलदार सागर मुंदडा व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी भेट घेत सांत्वन केले आहे. तसेच या पीडीत कुटूंबाला शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत केली आहे. तसेच या नाल्यावर पुल बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
            मंगळवारी  22 सप्टेंबर ला मुसळधार पावसाने सावर्डे गावाच्या मागील बाजूस असलेल्या देवीच्या नाल्याला मोठा पुर आला होता. या पुरात वनिता पादिर ही आदिवासी महिला शेतावरून घरी परतत असताना वाहुन गेली होती. सदरची महिला कुटूंबातील ऐकमेव कमावती होती. तीच्यावरच तीन मुलांसह, पती हे अवलंबून होते. त्यामुळे मोखाडा पंचायत समिती च्या सभापती सारिका निकम, तहसीलदार सागर मुंदडा व जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी तातडीने या पीडीत कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. सदरच्या नाल्यावर साकाव अथवा लहान पुल बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी सभापती सारिका निकम यांनी येथील ग्रामस्थांना दिले आहे.
            यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले, पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे साहेब, शाखा अभियंता भुसरा, सरपंच हनुमान पादिर, भाजप आदिवासी विकास आघाडी पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले व ग्रामस्थ उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!