खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मालेगावसाठी मिळालेल्या रुग्णवाहिकेचे झाले लोकार्पण
रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी मंत्री श्री.भुसे म्हणाले की, गरजू व गरजवंत रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा. असे आवाहन करत रुग्णवाहिकेचे नियोजन बघणारे राजू आलीझाड व संदिप मोरे यांना रुग्ण वाहिकेच्या चाब्याही यावेळी सुपूर्त करण्यात आल्या.
रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी मालेगाव महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, प्रभाग 1 चे सभापती नगरसेवक राजाराम जाधव, नगरसेवक भिमा भडांगे, तालुका प्रमुख संजय दुसाणे, राजेश गंगावणे, विनोद वाघ, प्रमोद शुल्का आदि पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.