पुणे -: गृह विभागात विशेष प्रधान सचिवपदी कार्यरत असताना अमिताभ गुप्ता यांनी डीएलएफ घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान बंधूंना लॉकडाऊनच्या काळात VIP ट्रीटमेंट दिली होती. आता यावर अमिताभ गुप्ता यांनी मौन सोडलं आहे.वाधवान कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अमिताभ गुप्ता यांनी पोलीस परवाना (Pass)मिळवून दिला होता. वाधवान प्रकरणात गुप्ता यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली असताना त्यांची पुण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. वाधवान प्रकरण हे माझ्यासाठी फक्त एक इंन्सिडंट होता आणि तो आता संपला आहे, असं पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘माध्यमा’शी बोलताना सांगितलं आहे.
पोलीस आयुक्तालयातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी पहिल्यांदाच वाधवान प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला. तसेच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सर्वोतपरी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच पुणेकरांना विश्वासात घेऊनच शहरात पोलिसिंग करणार आहे. पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर अमिताभ गुप्ता हे पहिल्यांदाच मीडीयासमोर आले.राज्याचे कारागृह महानिरिक्षक सुनील रामानंद यांनी गुन्हेगारी आणि पोलीस दलाच्या जीवनावर आधारित “कॉप्स इन ए क्वॉगमायर” अर्थात ‘दलदलीत फसलेला पोलीस’ ही एक रहस्यमय कांदबरी लिहिली आहे. पुण्यात याच कादंबरीचा आज प्रकाशन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे ही कांदबरी प्रकाशित होण्याआधीच लेखक सुनील रामानंद यांना एका वेबसीरीजची पण ऑफर मिळाली.दरम्यान, गृह विभागातील मुख्य सचिवपदी अमिताभ गुप्ता कार्यरत असताना त्यांनी डीएलएफ घोटाळ्यातील मुख्य कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्यासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना दिलेला पोलीस परवाना (Pass) मिळवून दिला होता. नंतर अमिताभ गुप्ता यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यांच्यावर गृहविभागानं कारवाई देखील केली होती.
मात्र, असं असताना गुप्ता यांची पुण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होतं.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, गृह विभागातील मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना दिलेला पोलीस परवाना ही मोठी चूक होती. या चुकीला शिक्षाही झाली. पण गुप्ता यांची कारकीर्द पाहिल्यास ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचे काम चांगले आहे. त्यांचं हे काम पाहूनच त्यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.