मुंबई

धक्कादायक ; एस टी महिला वाहकाने आपल्या मुलासह केली रेल्वेखाली आत्महत्या

 नाशिक, लासलगाव : येवला बस आगारात वाहक असलेल्या अंजली राजेश भुसनळे (47, रा. विठ्ठलनगर, निलंबरी कॉम्लेक्स, औरंगाबाद रोड) यांनी मुलगा उत्कर्ष (वय 27) याच्यासह काल मध्यरात्री दोन च्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी लासलगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

आज ही बाब उघडकीस आली. अंजली भुसनळे या येवला बस आगारात वाहक म्हणून कार्यरत होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ भुसावळकडे जाणार्‍या मार्गावर कि.मी. 233 च्या पोल क्र. 22/23 च्या दरम्यान मध्यरात्री ऐकमेकांचे हात ओढणीने बांधून रेल्वे खाली उडी मारुन जीवनयात्रा संपवली. अंजली आणि त्यांच्या मुलाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

अंजली भुसनळे या 15 ते 16 वर्षांपासून मृत पतीच्या जागेवर येवल्यात अनुकंपावर नोकरीस होत्या. उत्कर्ष हा नाशिक येथे नोकरीला होता. लॉकडाऊननंतर तो घरुनच काम करत होता. 3 ते 4 महिन्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये त्याचा विवाह झाला होता. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!