ठाणे

डोंबिवलीकरांचा `कचराकुंडी मुक्त शहर` संकल्पनेला प्रतिसाद..

त्रिमूर्तीनगर परिसरात जनजागृतीमुळे  कायापालट

डोंबिवली ( शंकर जाधव ) : येथील पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर येथील परिसरात कचराटाकला जात असल्याने दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांची चूक असली तरी रस्त्यावरील कचरा उचलण्याची जबाबदारी आपली नसल्याचे सांगत पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यावर भाजपने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केल्याने सदर ठिकाणचा कचरा उचलण्यात आला.त्यांनतर पालिकेने सदर ठिकाणी ठराविक वेळेत घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली. तर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा नियम असल्याने या परिसरातील नागरिकांनी स्वयंशिस्त लावत रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीत कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्रिमूर्तीनगर परिसरात  जनजागृतीमुळे  कायापालट झाल्याचे दिसते. डोंबिवलीकरांचा `कचराकुंडी मुक्त शहर` संकल्पनेला प्रतिसाद मिळत आहे.

 कचराकुंडी मुक्त शहर बनविण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी केला आहे.त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी यांनी कंबर कसली आहे.मात्र नागरिकांमध्ये आवश्यक जनजगृती होत नसल्याने नागरीक ओला- सुका कचरा वर्गीकरण न करता रस्त्यावर कचरा टाकतात.डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर परिसरात रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसराती प्रचंड दुर्गंधी पसरली होती. पालिका प्रशासना कचरा उचलत नसल्याची ओरड येथील नागरिक करत असल्याने भाजपचे नगरसेवक साई शेलार, जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,  भाजप शहर सचिव राजू शेख, युवा मोर्चा वार्ड अध्यक्ष रुपेश पवार, किरण राळे, नागेश हिरोले,  बि्रजपाल चव्हाण,  कृष्णा  गटू यांनी या कामात प्रशासनाला सहकार्य करत सदर ठिकाणचा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.यानंतर या ठिकाणी पालिकेने पावडर फवारणी केली. या ठिकाणी दरदिवशी ठराविक वेळेत घंटागाडी येत असल्याने आता नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीत कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. आपले शहर, आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याची जाण नागरिकांना आल्याने त्यांनी रस्त्यावर कचरा टाकणे बंद केला. अश्याच प्रकारे शहरातील झोपडपट्टी आणि चाळ परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता घंटागाडीत कचरा टाकण्यास लवकरच `कचराकुंडी मुक्त डोंबिवली`होईल असे जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!