नवी मुंबई

पोलिसांशी हुज्जत घालणारी झोमँटो गर्ल प्रियांका १ वर्षे तुरुंगातच

नवीमुंबई:- वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याने, एक वर्षापूर्वी अटक करण्यात आलेली सानपाडा येथील ‘झोमॅटो गर्ल’ प्रियांका मोगरे जामीन न मिळाल्याने एक वर्षापासून तुरुंगात आहे.
प्रियांकाने रागाच्या भरात पोलिसांना शिवीगाळ केली आणि पोलिसांचा ‘अहंकार’ दुखावल्याने, अतिशय किरकोळ, छोट्या गुन्ह्यासाठी तिला वर्षभर तुरुंगात राहावे लागले. ८ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता वाशी येथील सेक्टर १७ मध्ये नो पार्कींग झोनमध्ये दुचाकी लावल्यावरून २७ वर्षांच्या प्रियांका मोगरे हिचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला होता. तिच्या विरोधात वाशी येथील वाहतूक पोलिस शिपाई मोहन सरगर यांनी वाशी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.
तिच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणि दरोड्याचा प्रयत्न, शांततेचा भंग, धमकी देणे, अशी ३५३, २९४, ३९३, ५०६, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून केला आणि २० ऑगस्टला तिला अटक करण्यात आली होती.
प्रियांका ‘झोमॅटो’ कंपनीसाठी डिलिव्हरी देण्याचे काम करीत होती. तिचा पोलिसांशी वाद झाल्यानंतर पुढच्याच चौकामध्ये ४ पोलिसांनी तिला अडवून पोलिस ठाण्यात येण्याचे आदेश दिले. या सगळ्या प्रसंगाची व्हीडिओ क्लिप काढण्यात आली आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. या प्रकरणातील दोन व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते व्हीडिओ अजूनही इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या तरुणीला अगोदर पोलिस कस्टडी आणि नंतर न्यायालयीन कस्टडी मिळाली. तिला जामीन मिळण्यासाठीचा पहिला अर्ज फेटाळण्यात आला. नंतर तिला सप्टेंबर २०१९ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. मात्र तिच्या जामीनासाठी २ व्यक्तीही पुढे आल्या नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत प्रियांका भायखळा येथील तुरुंगात आहे.
तीन वर्षांची लहान मुलगी असणाऱ्या, प्रियांकाची सोशल मीडियावर बदनामी झाली म्हणून तिच्या नजीकचे, जवळचे असे कोणीही तिच्या जामीनासाठी, अन्य मदतीसाठी पुढे आले नाहीत.* फेब्रुवारी महिन्यामध्ये ‘प्रयास’ ही संस्था प्रियांकाच्या मदतीसाठी पुढे आली. त्यांनी तिच्यावतीने न्यायालयात अर्ज करून तिला वैयक्तिक हमीवर सोडण्याची विनंती केली, पण तो अर्ज फेटाळण्यात आला.
दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी प्रियंका प्रकरणाची फाईलच न्यायालयात पाठवली नाही. वाशी येथील न्यायालय ते ठाण्याचे सत्र न्यायालय अशा अनेक चकरा रमा काळे यांना माराव्या लागल्या. आता पुन्हा रमा काळे यांनी प्रयत्न सुरू केले. ‘प्रयास’तर्फे अॅड. भुजंगराव मोरे यांनी जामिनाचे रूपांतर रोख रकमेच्या स्वरूपात करण्यासाठी ठाण्याच्या सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज केला आणि या सप्टेंबर महिन्यात २१ तारखेला न्यायालयाने अर्ज मंजूर केला. २५ हजार रु. रोख रक्कम न्यायालयात जमा करण्याच्या अटीवर प्रियांकाला जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र प्रियांकाला एक महिन्याच्या आत दोन जामीनदार मिळवावे लागणार आहेत.
अँड. भुजंगराव मोरे यांनी सांगितले, की न्यायालयात लवकरच रोख रक्कम जमा करून प्रियांकाला जामीन मिळवून दिला जाईल.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!