ठाणे

ठाणे महापालिकेचा 38 वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

ठाणे (1ऑक्टो, संतोष पडवळ ): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ठाणे महापालिकेचा 38 वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. आज सकाळी ९.३० वाजता महापालिका भवन येथे उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम यांचे हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांना अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

तदनंतर महापालिका भवन येथील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना व शहरातील पूजनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख,अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे,उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त वर्षा दीक्षित, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मनेष वाघीरकर, सुरक्षा अधिकारी श्री.थोरवे आदी उपस्थित होते.

दरवर्षी कलामंचाच्यावतीने गायन, वादन, नृत्य, लघुनाटिका अशा विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाने ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन गडकरी रंगायतन मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. ठाणे महापालिकामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना महापालिका नेहमी प्रोत्साहन देत असते. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी वर्धापन दिनानिमित्त आपली कला सादर करतात. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांपासून ते अधिकारी वर्गापर्यंत सर्वजण या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कलाविष्कार सादर करतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा 38 वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!