डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्र पुरूष स्मृती जागरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा डोंबिवली पश्चिम महात्मा गांधी बगीचा येथे कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी राष्ट्र पुरुष स्मृती जागरण समितीच्या वतीने श्यामराव अत्रे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादानाच्या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष विजयराव मुळे, कार्यवाह, अनिल सरदेसाई, कोषाध्यक्ष मनिषा आचरेकर, श्यामराव अत्रे, गंगाधरजी पुरंदरे, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे,भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस समीर चिटणीस ,महिला मोर्चा अध्यक्षा तथा नगरसेविका विद्या म्हात्रे, युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील, नगरसेवक संदीप पुराणिक, उत्तर भारतीय संयोजक सुनील शुक्ला ,गुजराथी प्रकोष्ट संयोजक जयेश बारोट,मीडिया प्रमुख हर्षद सुर्वे तसेच भाजपाचे जेष्ठ , प्रकोष्ट ,मंडल पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.