डोंबिवली ( शंकर जाधव ) : जन्मदात्या पित्याने ९ वर्षीय मुलीवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर येथे घडली.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे.
याबाबत रामनगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अटक आरोप हा त्रिमूर्तीनगर येथे पत्नी आणि ९ वर्षीय मुलीबरोबर राहतो.त्याच्या पत्नीला क्षयरोगाचा आजार असल्याने ती काही दिवसांपासून आपल्या मुलीला घेऊन तिच्या आईकडे राहण्यास गेली होती. त्रिमूर्तीनगर जवळच आजीकडे राहणारी मुलगी खेळण्यासाठी वडिलांकडे गेली होती. त्याने दुपारच्या वेळी घरी कोणीही नसताना मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने मुलगी रडत रडत आईकडे गेली. घडलेलास सर्व प्रकार तिने आईला सांगितला.हा प्रकार ऐकून संतापलेल्या आईने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठले.पोलीस ठाण्यात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पित्याला अटक केली.अटक आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ५ ऑक्टोबरपर्यत पोलीस कोठदि सुनावण्यात आली आहे.