ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये काल रात्री दारू, तंबाखूजन्य पदार्थ नेणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा विभागाच्यावतीने पोलिसांच्या ताब्यात देऊन कोटपा-2003 कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
काल दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी कोव्हीड हॉस्पिटलमध्ये दारू, तंबाखू इत्यादी प्रतिबंधित वस्तू हॉस्पिटलमध्ये नेताना एका व्यक्तीस सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावतीने पकडण्यात आले. संबंधित व्यक्तीस उप आयुक्त श्री. केळकर यांच्यासमोर हजर करून त्याच्या सूचनेनुसार त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट – तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा 2003 ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याकडून दंड वसूल करण्याबरोबरच फौजदारी कारवाई देखील करण्यात येते. सदर प्रकरणी कोटपा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.