पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम
मास्क नव्हे तो तर ब्लॅक बेल्ट
खोडाळा (दीपक गायकवाड ) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.त्या अनुषंगाने मोखाडा पंचायत समितीने ” पुनश्च हरीओम ” म्हणत मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे.
दि 5 अॉक्टोबर पासून सर्व महसुली गावांमधून पंचायत समितीच्या पदाधिकारी सह सर्व अधिकारी गावभेटीतून समुपदेशन करीत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याबाबत सांगितलं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारची एक टीम जाईल. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘ब्लॅक बेल्ट’ म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणं टाळण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शिवाय ऑनलाईन खरेदीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केलं.
येत्या काळात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येवू नये म्हणून सोशल डिस्टंसिंगचं पालन होणं आवश्यक आहे. सरकारकडून आवाहन केलं जातं आहे. मात्र तरी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याला अंकुश बसावा म्हणून दस्तूरखुद्द मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम यांनीच कंबर कसली असून धडाडीने प्रचार मोहिम हाती घेतली आहे. त्यांच्या या मोहीमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून जनताही आवाहन स्विकारत असल्याचे दिसून येत आहे.
या कार्यक्रमासाठी सभापती सारीका निकम जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, हबीब शेख, राखी चोथे, भाजपाचे ज्येष्ठ नेते संतोष चोथे, दिलीप गाटे, पंस सदस्य प्रदीप वाघ,खोडाळ्याचे सरपंच प्रभाकर पाटिल, उपसरपंच मनोज कदम सर्व सदस्य तसेच युवराज गिरंधले गटविकास अधिकारी संगीता भांगरे, ता. वैद्य. अधिकारी किशोर देसले, यांचे सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व उपस्थितांनी सामाजिक अंतर राखीत मास्कचा वापर केला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबविण्यात आला असून यावेळी आशाताई, अंगणवाडी मदतनीस यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आहे.