डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या `इ` प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांची चौकशी करून निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक जिल्हाअध्यक्ष सुधीर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.लॉकडाऊन नंतर गरीब भाजीवाले, फेरीवाल्यांना त्रास देणे असे प्रकार सुरु असून गरीब फेरीवाल्यांनी आपले पोट भरायचे तरी कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे. फेरीवाल्याच्या पोटावर पाय देणाऱ्या या अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे अशी भूमिका सुधीर पाटील यांनी घेतली आहे. लॉकडाऊन मध्ये घरात बसून पोट भरता येत नव्हते.आता लॉकडाऊन मध्ये शिथिलता आली असून सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून भाजी विकत आहोत. आता त्यावरही कारवाईची बडगा उभारला तर आम्ही गरिबांनी जगातचे कसे असा प्रश्न फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे.फेरीवाल्यांनी याबाबत शासनाकडे आपली व्यथा पोहचावा अशी विनंती फेरीवाल्यांनी सुधीर पाटील यांच्याकडे केली. यावर लक्ष देत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पावर यांना पत्र दिले आहे.
प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी
October 8, 2020
65 Views
1 Min Read

-
Share This!