नागरिकांना पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याची महापालिकेचे आवाहन
बृहन्मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा आज सकाळी काही तास खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. ज्यामुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर त्याचा अंशतः परिणाम होऊन, काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. यानुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असल्याने उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.
..
तरी या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.