डोंबिवली ( शंकर जाधव ) : नामांकित कंपन्यांचे बनावट तूप बनवणाऱ्या पाच जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. क्राईम युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांसह अधिकारीवर्ग,अन्न आणि औषध निरीक्षक अधिकारी तसेच संबंधित तूप कंपन्याचे प्रतिनिधी यांच्यासह कल्याण क्राईम युनिटने डोंबिवली पुर्वेकडील गोग्रासवाडी येथून एका इसमास ताब्यात घेतले.त्याच्याकडून ८३ लिटर पॅकिंग असलेले अमूल, गोवर्धन, ओम कृष्णा, सागर या नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट तुपाच्या पिशव्या, डब्बे,वजन काटा असे अंदाजे ४४,८७५ रु.किमतीचा असे जप्त करण्यात आले.सदर कारवाई केल्यानंतर पराग मिल, फुड्स लिमी.रिजनल सेल्स व्यव्स्थापक यांच्या फिर्यादिवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर बनावट तुप,खरेदी-विक्री करणाऱ्या ठाणे, नयानगर,भाईदर,मिरारोड,दहिसर या भागातून आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले.अटक आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता दहिसर येथून अटक केलेला आरोपी हा स्वतः त्याच्या साथीदारांसह दहिसर पूर्वेकडील वाघदेवीनगर येथील गाळ्यामध्ये लायन वनस्पती व सोया लाईट तेल याचे मिश्रण करून त्यामध्ये आर्टफिशियल देशी तुप प्लेवर टाकून त्यापासून सदरचे बनावट पिशव्यांमध्ये भरून ते सदर कंपन्याचे असल्याचे भासवून नामाकिंत कंपन्याचे उत्पादनाचे बनावटीकरण करून ग्राहकांना विक्री करून ग्राहकांची तसेच संबंधित तुप वितरण करणाऱ्या कंपन्याची फसवणूक केली आहे.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपींकडून अमूल, गोवर्धन, कृष्णा व सागर या कंपन्याची फसवणूक केली आहे.अटक आरोपींकडून अमूल, गोवर्धन, कृष्णा व सागर या कंपन्याच्या बनावट पिशव्यांमध्ये भरून पॅक केलेले एकूण १६८ लिटर बनावट तुप, बनावट तुप तयार करण्यासाठी करण्यासाठी वापरण्यात येणारा १ टन कच्चा माल जवळपास त्यामध्ये २१० लिटर डालडा,७३५ लिटर तेल, गोडाऊनमध्ये तयार करून ठेवलेले १० लिटर बनावट तुप, अमूल-गोवर्धन-सागर या नामांकित कंपन्यांचे नावाच्या बनवत पिशव्या, इलेक्ट्रिक सिलिंग मशीन व इतर सामुग्री असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.