डोंबिवली ( शंकर जाधव ) अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सरसकट महिलांना ठराविक वेळेतच रेल्वे प्रवास करण्याची परवानगी शासन आणि रेल्वेकडून नुकतीचदेण्यात आली. त्या वेळेनुसारच रेल्वे तिकीट वितरण करणे क्रमप्राप्त असले तरी शुक्रवारी सकाळी महिलांना वेळेपूर्वीच रेल्वे तिकीट वितरण करण्यात आल्याची माहिती डोंबिवली रेल्वे उप-व्यवस्थापक शाहू यांनी दिली. मात्र वेळपूर्वी रेल्वे तिकीट वितरित केल्याने डोंबिवली स्थनाकात गोंधळाचे वातावरणl निर्माण झाले होते. महिलांची गर्दी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
डोंबिवली स्थनाकात गेले दोन दिवस महिला प्रवाश्याची गर्दी वाढत आहे. जरी सकाळी 11 नंतर सरसकट महिलांना प्रवेश असला तरी तिकीट लवकर मिळावे म्हणून महिला सकाळी 9 वाजल्यापासूनच स्थानकात गर्दी करतात.
प्रवासाचे तिकीट फक्त तिकीट खिडकीवरच मिळत असल्याने त्या खिडकीच्यासमोर महिला प्रवाश्यांच्या रांगा लागत आहेत. रेल्वेस्थानकावरील युटीएस तिकीट मशीन बंद असल्याने रेल्वे प्रवाश्यांना तेथे तिकीट घेता येत नाहीत. काही प्रवाश्यांच्या याबाबत तक्रार केल्यावर स्वयंचलित मशीनद्वारे तिकीट काढण्याची परवानगी दिली. तर क्यू आर कोड शिवाय तिकिटांचा दुरुपयोग करून अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त रेल्वे प्रवासी तिकिटे काढून नव्या समस्या निर्माण करतील. यामुळे युटीएस तिकीट मशीन बंद करण्यात आली असल्याने ठराविक रांगेमुळे सकाळी गर्दी झाली. परंतु काही वेळाने गर्दी कमी झाली आणि कोणतीही समस्या निर्माण झाली नसल्याचे शाहू यांनी सांगितले. परंतु वेळपूर्वी रेल्वे तिकीट वितरित केल्यामुळे सकाळी डोंबिवली स्थनाकात गोंधळाचे वातावरण दिसून आले.