महाराष्ट्र

उद्यापासून राज्यातील जिम पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या नियमावली

मुंबई – राज्यातील व्यायामशाळा दस-यापासून (२५ ऑक्टोबर ) पुन्हा सुरू होणार आहेत.यासंबंधी राज्यसरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे.दस-याला राज्यातील जिम सुरु करणार असल्याची माहिती याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

लॉकडानमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या जिम सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून त्यासंबंधीचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यभरात २५ ऑक्टोबरपासून जिम सुरु करण्यासाठी परवानगी देत आहोत. ही परवानगी कंटेनमेंट झोनबाहेरील जिमसाठी आहे.यासंबंधीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येईल.

यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाने आखून दिलेल्या नियम लक्षात घेतले जातील. करोनासंबंधित सर्व नियमांचं पालन केलं जावं असं आदेशात म्हटले आहे.

या नियमांचे पालन बंधनकारक

जिममध्ये शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टींबरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे आवश्यक
व्यायामशाळा सदस्यांना संपूर्ण नियमावलीची माहिती द्यावी.

व्यायामशाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे.

व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे, उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.

प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.

सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टीम, सौना बाथ बंद राहणार.

दररोज रात्री व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!