डोंबिवली ब्लॉक कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष प्रणव केणे यांची मागणी
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिक्षेत्रात असणाऱ्या समशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत द्यावी अशी मागणी डोंबिवली शहर कॉंग्रेस कमिटी (बी) ब्लॉक पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना केली आहे. या विषयाचा ठराव महापालिकेच्या १९९५ च्या तत्कालीन प्रथम महापौर आरती मोकल यांनी मांडला होता.
डॉ. सूर्यवंशी यांना दिलेल्या पत्रात केले यांनी म्हटले आहे कि, सदर ठरावाला सर्वानुमते सभागृहाची मंजुरी मिळाली होती. मात्र अद्याप २०२०२ साल उजाडले तरी त्याबाबत प्रशासन काहीच उपाययोजना करीत नाही. पालिकापरिक्षेत्रातील नागरिकांसाठी कमीत कमी अशा प्रकारची सुविधा मिळावी याची मागणी सर्वस्तरावर होत आहे. पालिका परिक्षेत्रात ज्या स्मशानभूमी अस्तित्वात आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत. काही स्मशानभूमीत गॅस, डिझेल शवदाहिनी माध्यमातून अंत्यविधी केले जातात परंतु त्या ठीकाणीही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी स्मशानभूमी अस्तित्वात असली तरी तेथे कोणतीच साधनसामुग्री नसल्याने त्याचा वापर करता येत नाही. जर पालिका प्रशासनाने अंत्यविधीसाठी लागणारे सामान उपलब्ध करून दिले तर नागरिकांची मुलभूत गरज पूर्ण होईल. यावेळी युवक कॉंग्रेस डोंबिवली विधानसभा माजी अध्यक्ष राहुल केणे उपस्थित होते.