ठाणे

महिला बचतगटाला शिवसेनेची मदत…  बचत गटातील उत्पादनाला शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रेंकडूनखरेदीची हमी….

डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आधाडीवर असून त्यांचाही हातभार कुटुंबासाठी लागत आहे. डोंबिवलीत बचत गटाच्या माध्यमातून महिला मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाल्या असून त्या स्वावलंबी झाल्या आहेत. दिवाळीच्या पदार्थाचे उत्पादन महिला करीत असून त्यासाठी त्यांनी बचत गट तयार केले आहेत. सुमारे २५ बचत गटाच्या माध्यमातून ३५० महिलांचे एकत्रीकरण झाले असून त्यांच्या दिवाळीच्या उत्पादनाला स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी संपूर्ण मालाच्या खरेदीची हमी घेतली आहे. दिवाळीच्या सणासाठी या महिलांनी दिवाळीचा फराळ तयार केला असून संपूर्ण डोंबिवलीकर दिवाळीत त्याचा आस्वाद घेणार आहेत.

सुवर्णा बचत गट, जय स्वामींनी, अस्मिता, शिवप्रेरणा, शिवकन्या, नारी संघर्ष, नारी शक्ती, श्रद्धा-सबुरी, आद्या, सुरभी, श्री गणराज, श्री साई सद्गुरू, स्वरा, गृहिणी, एकता, श्री स्वामी कृपा, नवदुर्गा अशा नामकरणाने बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक बचत गट ठराविक काम करीत असून वेगवेगळ्या पदार्थाची जबाबदारी घेतली आहे. चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, शेव, चकली आदी दिवाळीच्या फराळाचे विविध प्रकारचे उत्पादन महिला करीत आहेत. या बचत गटातील श्रद्धा भारंबे म्हणाल्या, लॉकडाऊन झाल्यापासून सर्वांची परिस्थिती बिघडली आहे. कामधंदा नसल्यामुळे काय करावे हे सुचत नव्हते. दरम्यान नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी सुचवलं कि तुम्ही दिवाळीचे पदार्थ करा. आम्ही तयार केलेला माल ते संपूर्णपणे घेणार आहे यासाठी लागणारे सामानही त्यांनीच आणून दिले आहे.

अशा प्रकारच्या बचतगटात महिला एकत्रपणे येऊन काम केल्याने सर्वांचा काही प्रमाणात आर्थिक प्रश्न सुटला आहे. याबाबत नगरसेवक दिपेश म्हात्रे म्हणाले, दरवर्षी दिवाळीत आम्ही उद्योजकांकडून दिवाळीचे पदार्थ घेतो. पण यावर्षी उदयोजकांकडून न घेता बचत गटातील महिलांना संधी दिली आहे. लॉकडाऊनमुळे अनके समस्या निर्माण झाल्या आहेत. महिलांनी तयार केलेल्या मालाला विक्रीचा प्रश्न येतो. याप्रकारे जर बचत गटातील महिलांनी काम केले तर त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला ग्राहक मिळेल. ही चांगली संकल्पना होती ती प्रत्यक्षात साकारल्याने महिलांचा काही प्रमाणात आर्थिक प्रश्न सुटला असल्याने आनंद होत आहे. त्या सर्वांची दिवाळी नक्कीच आनंदात जाईल.जय स्वामिनी बचत गटातील सदस्या श्रद्धा घाग यांनी शिवसेने नगरसेवक दिपेश म्हात्रे यांचे आभार मानत महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी शिवसेना नेहमीच मदत करत असल्याचे सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!