ठाणे

डोंबिवलीतील खंबाळपाडा भागात २ दिवसाचे जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ

डोंबिवली :  सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवली शहरातील खंबाळपाडा येथे २ दिवसाचे जिवंत मुलं मिळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे मुलं कोणी ठेवले कुणाचे आहे याबाबत टिळक नगर पोलीस तपास करीत असून पुरुष जातीचे हे मूल ताब्यात घेऊन बालआश्रमात ठेवले आहे.

खंबाळपाड्यातील आरबीटी शाळेजवळ असणाऱ्या एका लाकडाच्या वाखारीतून लहानमुलाचा रडण्याचा आवाज येत असल्यामुळे शेजारीच असलेल्या दुकानदाराने आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले असता दोन ते तीन दिवसांपूर्वी जन्मलेले मूल पांढऱ्या कपड्यात गुंडालेल्या अवस्थेत सापडले. दुकानदाराने हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. शेजारच्या महिलांनी धाव घेऊन बेवारसरित्या आढळून आलेल्या मुलाला ताब्यात घेऊन टिळक नगर पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मूल ताब्यात घेऊन त्याला उपचारांसाठी रुग्णलायत दाखल केले. मात्र मूल सुखरूप असून त्याला भूक लागल्यामुळे तो रडत होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी मुलाची रवानगी डोंबिवलीतील बालआश्रमात केली असून अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुलाच्या मातेचा शोध घेण्यात येत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!