नेरळ, ता ३ : पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेन उद्यापासून धावणार आहे. अमन लॉज ते माथेरान अशा दररोज चार फेर्या धावणार असून पर्यटकांना यांच्या मोठा फायदा होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात मिनीट्रेन गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर पावसाळ्यात ही मिनीट्रेन बंद होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यादरम्यान माथेरानच्या राणीसह सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. नंतर अॅनलॉकची सुरुवात होताच माथेरानला पर्यटक येण्याची सुरुवात झाली. मात्र वाहतूकीची सोय नसल्यामुळे माथेरान येथे फिरायला येणार्या पर्यंटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार महिने यी मिनी ट्रेनची सेवा बंद असते. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून नेरळ माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्वपदावर येत होती. मात्र यंदा या मिनीट्रेनली सुरु होण्यास उशिर झाला आहे. माथेरानच्या पर्यटक व्यावसायिकांनी मिनीट्रेन सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने बुधवारपासून ही मिनीट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असणार मिनीट्रेनचे वेळापत्रक
पहिली मिनीट्रेन माथेरानवरुन सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि अमन लॉजला ९ वाजून ४८ मिनिटांनी पोहचेल. तर दुसरी मिनीट्रेन अमन लॉजवरुन सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि माथेरानला सकाळी १० वाजून १३ मिनिटांनी पोहचणार आहे. तर तिसरी मिनीट्रेन सांयकाळी ४ वाजता माथेरानवरुन सुटणार असून अमन लॉजला ती सांयकाळी ४ वाजून १८ मिनिटांनी पोहचणार आहे. चौथी मिनीट्रेन अमन लॉजवरुन सांयकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून ती माथेरानला ४ वाजून ४३ मिनिटांनी पोहचणार आहे. या मिनीट्रेनने प्रवास करणार्या सर्व पर्यटकांना रेल्वेने घालून दिलेल्या कोविड नियमावलीचे पालन करायचे आहे.