डोंबिवली ( शंकर जाधव ) : अर्णव गोस्वामी यांना अटक केल्याप्रकरणी भाजपने डोंबिवलीतील इंदिरा चौकात निदर्शने करत रम्हविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.यावेळी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर,जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे,जिल्हा उपाध्यक्ष संजीव बिरवाडकर, भाजपयुमोचे मिहीर देसाई यआदींनी निदर्शने केली. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.राज्य सरकार हाय –हाय , लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा निषेध असो, मोगलाईपद्धतीने काम करणाऱ्या सरकारचा निशेष असो,ठाकरे सरकार हाय-हाय अश्या घोषणाबाजी करण्यात आल्या.यावेळी शशिकांत कांबळे म्हणाले, राज्यसरकारने अर्णव गोस्वामी यांना अटक करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना आणि पत्रकारितेला तुरुंगात डांबले. आपले मत व्यक्त व्यक्त करण्याचा हक्क सर्वाना आहे. जुनी केस काढण्याच आणि आपल्या हक्काचा गैरवापर करायचा हे महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध करत आहोत. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आले.
अर्णव गोस्वामी यांना अटक केल्याप्रकरणी डोंबिवलीतील भाजपची निदर्शेने
November 4, 2020
37 Views
1 Min Read

-
Share This!