डोंबिवली (ठाणे) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय / राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक – राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेबजी कटारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे समर्थ बँक्वेट हॉलमध्ये सोमवार दि.७ नोव्हें. २०२० रोजी उत्साहात पार पडली. या बैठकीत मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारीणी बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष – अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या निधनानंतर रिपब्लिकन पक्ष आपली स्वतंत्र ओळखच हरवुन बसला आहे. प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांनी नेहमीच भांडवलदारी पक्षाच्या वळचणीचे राजकारण केल्याने रिपब्लिकन पक्षाची स्वतंत्र राजकीय ओळख होऊ शकली नाही म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने शेवटच्या घटकांपासून पक्षबांधणीस प्राधान्य दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष हा फक्त “राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षच” उभा करू शकतो असा आशावादही त्यांनी बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व उपेक्षित वंचित समाज घटक सहभागी होत असून त्यांना आधार व त्यांच्या समस्यांना न्याय देण्याचे संपूर्ण कार्य हा पक्ष करीत असून पक्ष मजबुतीसाठी नेते, कार्यकर्ते जीवापाड परिश्रम घेत आहेत. जनतेमध्ये बांधिलकी व प्रत्येकाच्या भावना जपण्यासाठी आपण एकजुटीने काम करून पीडित जनतेला त्यांच्या न्यायाचा व हक्काचा वाटा मिळवून देऊन आम्ही आमचे समाजहिताचे कार्य अखंड देशभर तैनात करू आणि यासाठी माझ्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वाटा हा बहूमोलाचा असेल असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील प्रतापसिह हायस्कुल या शाळेमध्ये पहिले पाऊल ठेवले. म्हणूनच हा दिवस “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे अवचित्त साधून मान. अण्णासाहेबजी कटारे यांनी आपल्या कार्यकारणीला अपेक्षित शिकवण दिली आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाची सांगता झाली