ठाणे

पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा -सुनील लिमये

डोंबिवली  ( शंकर जाधव )  : पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून डॉ. सलाम अली या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या थोर पक्षीतज्ञांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ स्पॅरोताई फाउंडेशन तर्फे `सलाम डॉ. सलीम अली-२०२०२` हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.स्पॅरोताई फाऊंडेशनव्या अध्यक्षा डॉ.ज्योती परब व सचिव डॉ.राज परब यांच्या मार्गदर्शनाखाली फेसबुकच्या माध्यमातून हा उपक्रम सलग महिनाभर सुरु राहणार आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या सहभागाने चिमणीवर आधारित स्वरचित गाणी चित्रपटाच्या चालीवर गुंफून सादर करण्यात येत आहेत. सदर स्वरचित गाण्यांच्या संग्रहाचे `चिऊताईचा चिचिवाट` काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुनिल लिमये-अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम मुंबई यांच्या हस्ते मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे शासकीय नियमांचे पालन करत पार पडले.

       या पुस्तकाची डिजिटल प्रत amazon kindle वर उपलब्ध करण्यात आली आहे. या सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना सुनिल लिमये यांनी ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ या कल्पनेने प्रेरित होऊन पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून स्पॅरोताई फाउंडेशन,’सलाम डॉ.सलीम अली’ या उपक्रमाअंतर्गत चिमणी संवर्धनाचे जे कार्य करीत आहे. त्यांच्या या कार्याला माझा सलाम. समाजातील सर्व घटकांनी या अभियानात सहभाग दाखवला तर आपण काही प्रमाणात तरी चिमण्या आणि त्या अनुषंगाने निसर्ग वाचवू शकतो असे मत व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. स्पॅरोताई फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.ज्योती परब यांनी विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या उपक्रमातील सहभागामुळे चिमणीच्या पंखात गरुड भरारीचे बळ आले आहे असे विधान केले व या उपक्रमाला ( @ SparrowTaiFoundation ) या फेसबुक पेज वरून जगभर पोहोचविण्यासाठी आवाहन केले. संस्थापक डॉ. राज परब यांनी, या उपक्रमामुळे देशाची भावी पिढी म्हणजे विद्यार्थी यांच्या मनामनात चिमणी प्रेम जागृत होऊन ते नक्कीच चिमणी संवर्धनाकडे एक पाऊल पूढे टाकतील असा आत्मविश्वास दाखविला. जेष्ठ समाजसेवक माणिक पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना पक्षांना कोंडून न ठेवता त्यांना आकर्षित करण्यासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी दाणा पाण्याची सोय करूया, झाडे लावूया व निसर्ग वाचूया असे सांगत पत्रकारांना हा उपक्रम जगभर पोहचवण्याचे आवाहन केले . या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांना स्पॅरोताई फाउंडेशन तर्फे चिऊसाठी घरटी देण्यात आली. मान्यवरातर्फे स्पॅरोताई फाउंडेशनच्या समन्व्यकांचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. साईराज परब या विद्यार्थ्याने चिऊताईचे एक सुंदर गाणे सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या आगळ्यावेगळ्या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   डॉ.  प्रा. प्रकाश माळी यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले. तर कार्यक्रमाची सांगता साक्षी परब हिने उपस्थितांचे आभार व्यक्त करून केली. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक माणिक पाटील, मल्लिका अर्जुन-वनसंरक्षक व  राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी-संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, स्पॅरोताई फाउंडेशनचे समन्वयक अमोल हडकर, नितीन सावंत, साईराज परब, प्रसिद्धी प्रमुख सौ. प्रणाली गिरी, WCPA चे महासचिव ख.र.माळवे, *आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहते, मथुराई संतोष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रकाश माळी, वयम प्रतिनिधी राजेंद्र गोसावी, जयंत भावे -महाकवी कालिदास प्रतिष्ठान- मुंबई, ठाणे जिल्हा विभाग प्रमुख, सदस्या  रुची पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!