Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्यचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राने साधलेल्या प्रगतीचे सिंहावलोकन या अंकात करण्यात आले आहे.
भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती व्हावी यासाठी मराठीजनांनी मोठे आंदोलन उभारले, त्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. या साठ वर्षात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले. देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन बनलेल्या महाराष्ट्राने इतर राज्यांना प्रेरणा देता येईल असे कार्य केले. महाराष्ट्राने केलेल्या या कार्याचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. याशिवाय मंत्रिमंडळ निर्णय आणि पोषण आहारातील महाराष्ट्राची कामगिरी याविषयी विशेष लेखाचाही अंकात समावेश आहे.
संपूर्ण अंक वाचण्यासाठी खाली क्लिक करा