पाककला

अंडा बिर्याणी – पाककृती

अंड्याची खमंग बिर्याणी अत्यंत सोपी सहज होणारी अंडा बिर्याणी

अंडा बिर्याणीचा भात बनविण्यासाठी लागणारा जिन्नस

  • १ कप लांब बासमती तांदूळ
  • २ – ३ तमालपत्र
  • १ जायपत्री
  • १ – २ दालचीनीचे तुकडे
  • ४ – ५ काळी मिरी
  • २ वेलच्या
  • अर्धा चमचा जीरे
  • ४ – ५ लवंगा
  • १ मोठी वेलची
  • १ चमचा तूप
  • चवीनुसार मीठ
  • पाणी
  • १ चमचा तूप

अंडा बिर्याणीचा मसाला/बेससाठी लागणारा जिन्नस

  • १ कप बारीक/उभा चिरलेला कांदा
  • १ मध्यम बारीक चिरलेला टॉमॅटो
  • १ चमचा आलं – लसूण पेस्ट
  • १ उभी चिरलेली हिरवी मिरची
  • अर्धा कप दही
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • थोडीशी पुदिना पाने
  • २ चमचे बिर्याणी मसाला
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा धणा पावडर
  • चवीनुसार मीठ
  • तेल

अंडा बिर्याणीसाठी अंडी मॅरिनेट करण्यासाठी लागणारा जिन्नस

  • ४ – ६ उकडुन सोललेली अंडी
  • १ चमचा धणा पावडर
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • १ चमचा लाल तिखट
  • पाव चमचा हळद

अंडा बिर्याणी सजावटीसाठी लागणारा जिन्नस

  • ७ – ८ केशरच्या काड्या (पाण्यात भिजवून)
  • तळलेला कांदा
  • तूप
  • तेल

अंडा बिर्याणीचा भात बनविण्याची पाककृती

  • सर्वप्रथम तांदूळ २ -३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
  • पाणी निथळून घ्या.
  • आता त्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून साधारण अर्धा तास भिजत ठेवा.
  • एका भांड्यात ४ – ५ कप पाणी घ्या.
  • पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये तमालपत्र, जायपत्री, काळी मिरी, लवंगा, वेलच्या, १ चमचा तूप व चवीनुसार मीठ टाका.
  • एक उकळी येऊ द्या.
  • उकळी आल्यावर भिजत घातलेले तांदूळ पाणी निथळून त्यामध्ये टाका.
  • व्यवस्थित ढवळून घ्या. गॅस मोठा करून साधारण ९० टक्क्यापर्यंत भात शिजवून घ्या.
  • गॅस बंद करून आता भात बाजूला ठेवून द्या.

अंडा बिर्याणीसाठी अंडी मॅरिनेट करण्याची पाककृती

  • एका भांड्यात लाल तिखट, गरम मसाला, धणा पावडर, हळद आणि मीठ एकत्र करा.
  • उकडलेली अंडी घ्या. त्याला चारही बाजूने सुरीच्या सहाय्याने छेद करा.
  • ही अंडी वरील मिश्रणात व्यवस्थित घोळवून घ्या.
  • एका पॅनमध्ये थोडेसे तेल घ्या. तेल कडक तापल्यावर त्यामध्ये मॅरिनेट केलेली अंडी सोडा. सर्व बाजूने शॅलो फ्राय करून घ्या.
  • तयार मसाला अंडी बाजूला ठेवा.

अंडा बिर्याणीचा मसाला/बेस बनविण्याची पाककृती

  • पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात थोडेसे तूप टाका.
  • गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा टाकून सोनेरी रंगापर्यंत परतून घ्या.
  • कांदा परतल्यावर त्यामध्ये टोमॅटो परता.
  • आता त्यात आलं – लसूण पेस्ट, लाल तिखट, धणा पावडर, हळद आणि हिरवी मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • साधारण ३ – ४ मिनिटे परतल्यावर टोमॅटो मऊ शिजेल.
  • जर मसाला सुका वाटल्यास थोडेसे पाणी घाला व परतून घ्या.
  • आता यामध्ये दही फेटून टाका. सर्व व्यवस्थित एकत्र करा.
  • थोडा वेळ शिजू द्या. शिजताना बाजूने तेल सुटायला लागल्यावर त्यामध्ये बिर्याणी मसाला व चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • आता यामध्ये पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्या.
  • तयार आहे बिर्याणी मसाला/बेस.

अंडा बिर्याणी बनविण्याची पाककृती

  • जाड बुडाच्या पातेल्यात सर्वात आधी तयार बिर्याणी मसाला/बेस पसरून घ्या.
  • मसाला जर सुका झाला असेल तर थोडे पाणी टाकून उकळून घ्या.
  • मसाला उकळल्यावर त्यात मॅरिनेटेड अंडी घालून मिसळा.
  • भातामधील पाणी निथळून तयार भात त्यावर पसरा.
  • भातावर तळलेला कांदा, पुदिन्याची पाने व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरा.
  • वरून पाण्यात भिजवलेल्या केशरच्या काड्या व तूप पसरा.
  • आता त्यावरती थोडे पाणी शिंपडा. वरती झाकण ठेवून भात शिजू द्या.
  • गॅस मंद चालू राहू द्या.
  • साधारण १० – १५ मिनीटे बिर्याणी मंद आचेवर शिजू द्या.
  • जर तुमच्याकडे जाड बुडाचे भांडे नसेल तर गॅसवर तवा ठेवून त्यावर जे असेल ते भांडे ठेवा त्यामुळे बिर्याणीला खुप हीट लागणार नाही व करपणारही नाही.
  • भात व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा.
  • तयार आहे गरमागरम, चटपटीत अंडा बिर्याणी.
  • अंडा बिर्याणी तुम्ही रायत्या सोबत खाऊ शकता. तसेच मटण किंवा चिकनच्या रस्स्यासोबतही खाऊ शकता.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!