ठाणे

शब्दगंगा दिवाळी अंकाचे ऑनलाईन प्रकाशन

प्रतिनिधी कल्याण, दि. 18 ः महाराष्ट्रातील सर्व लेखक-कवींना एकत्र करून आपले काव्य सादर  करण्याची संधी शब्दगंगा संपादिका गंगाजल पाटील यांनी सर्व साहित्यिकांना उपलब्ध करून दिली व  प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही अभिमानास्पद बाब असून,शब्दगंगा ई दिवाळी अंक 2020 वाचकांना मेजवानी ठरेल! नवोदित कवींना मार्गदर्शन करणारा दीपावलीच्या तेजोमय प्रकाशात शब्दगंगा ई दिवाळी अंकाची संकल्पना  वाखाणण्याजोगी आहे. असे गौरवोद्गार माजी नगरसेविका, अलका अवलसकर, कल्याण यांनी काल शब्दगंगा अनावरण सोहळ्यात  काढले.


काळा तलाव कल्याण येथील ज्येष्ठ नागरिक ग्रुपमधील सदस्य मालतीताई गोखले, दिपक पवार आदी मान्यवर यांच्या उपस्थित माजी नगरसेविका अलका अवलसकर,  कल्याण यांच्या हस्ते शब्दगंगा ई दिवाळी अंकांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रकाशन केले. ऑनलाइन असल्यामुळे शब्दगंगा दिवाळी ई अंक 2020 सहजपणे वाचता येईल, अशा पीडीएफ स्वरूपातील शब्दगंगा दिवाळी अंक व्हॉट्सऍप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम व ई-मेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा अविरत प्रयत्न राहील असे संपादिका गंगाजल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!