सामान्य जनता अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवेल – रोहिदास मुंडे
दिवा (बातमीदार) :- वाढीव वीज बिलात सवलत देण्यास नकार देणाऱ्या निर्दयी राज्य सरकारचा निषेध म्हणून दिवा भाजपच्या वतीने दिवा टर्निंगला वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली.
वीज बिलाविरोधात राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरु केले आहे. काही ठिकाणी वीज बिलांची होळी करण्यात आली असून त्याच धर्तीवर दिव्यात ही टर्निंगला भाजप कार्यकर्ते एकत्र येऊन हातातील वीज बिलांची प्रत होळीत टाकून राज्य सरकारच्या नावाने घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
दिव्यात गेल्या वर्षापासून महावितरणच्या जाऊन टोरोंटो कंपनी आली आहे. तसेच या लॉक डाऊन मध्ये काहींच्या नोकऱ्या गेल्या. तर काही जण गावी जाऊन राहिले होते. अशा परिस्थतीमध्ये ही दिव्यातील नागरिकांना दुप्पट ते तिप्पट वीज बिले मिळाली आहेत. नोकरी नसल्याने व आम्ही गावी होतो. वीज वापरली च नाही तर बिल कसे भरायचे हा प्रश्न दिवेकरणना पडला आहे. यामुळे ह्या बिलाचे करायचे काय असे संतप्त होऊन नागरिक आणि दिवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीज बिलाची होळी करून निषेध केला आहेरोहिदास मुंडे, भाजपा ठाणे शहर कार्यकारणी सदस्य- सामान्य माणसाला वेठीस धरणाऱ्या आणि कोरोना संकटात सामान्य माणसावर अन्याय करणाऱ्या सरकारला जनताच धडा शिकवेल. असे मत त्यांनी माडले आहे.
हे आंदोलन मंडळ अध्यक्ष अँड.आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली व रोहिदास मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाच्या वेळी भाजपा शहर कार्यकारणी सदस्य अशोक पाटील, भाजपा दिवा सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.अर्चना पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग, मंडळ उपाध्यक्ष अंकुश मढवी, कमलाकर पाटील, रमेश यादव, हरिशंकर शर्मा, प्रकाश पाटील, अनुराज पाटील, महिला मोर्चा विभागीय सचिव सौ सुप्रिया भगत, मंडळ सचिव चंद्रकांत मोरे, जितू गुप्ता, प्रदीप घाडीगांवकर, आनंदा पाटील, युवा सरचिटणीस कपिल रोडे, अशोक सोळंकी, प्रसाद भोईर, नितीन चव्हाण, क्रांती सिंग संजू कानोजिया, रोहित ओझा व इतर पदाधिकारी उपस्थित होत