महाराष्ट्र

मोखाड्यात महामंडळाकडून धान्य खरेदीला सुरूवात.


आमदार सुनिल भुसारांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उदघाटन.

मोखाडा. ता. ( बातमीदार दीपक गायकवाड  ) – मोखाड्यात दिवाळी सरताच शेतकर्यांचे धान्य खळ्यातुन घरी येऊ लागले आहे. याची समयसुचकता साधत आदिवासी विकास महामंडळाने आधारभुत धान्य खरेदी योजना अंमलात आणली आहे. तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खोडाळा, मोखाडा आणि मोरचोंडी येथील आधारभूत धान्य केंद्राचे उदघाटन विक्रमगड विधानसभेचे आमदार आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सुनिल भुसारा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच लगेचच धान्य खरेदी सुरू केली आहे. 

यावेळी आमदार सुनिल भुसारा यांनी महाविकास आघाडी सरकार आदिवासी शेतमजुर, शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असुन शेतकर्यांच्या धान्याला योग्य आणि हमीभाव मिळावा, शेतकर्यांची व्यापार्यांकडून पिळवणूक होऊ नये म्हणून आधारभूत धान्य केंद्र तातडीने सुरू केले आहे. तर महामंडळाची एकाधिकार धान्य खरेदी योजना ही सुरू करण्याचा सरकारचा माणसं असुन लवकरच त्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. सध्यस्धितीत भातास 1888 तर नागली (नाचणी) स 3295  रूपये क्विंटल चा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत. 

या उदघाटन कार्यक्रमास मोखाडा पंचायत समिती च्या उपसभापती लक्ष्मी भुसारा, सदस्य प्रदिप वाघ, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक व्ही एस गांगुर्डे, ऊपप्रादेशिक व्यवस्थापक ए व्ही वसावे, लेखापाल प्रफुल्ल खैरनार, शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, राष्ट्रवादी चे विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोठेकर, प्रदेश सदस्य रघुनाथ पवार, सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच मनोज कदम, खोडाळा सोसायटी चे सभापती भरत गारे यांसह ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी ऊपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!