ठाणे

वाढीव वीज बिलाबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा कार्यालयाला टाळे लावू…

             भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचा वीज वितरण कंपनीला इशारा…

 डोंबिवली ( शंकर जाधव ) लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना पोट भरणे मुश्कील झाले होते. मात्र महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने सानान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता वाढीव विजे पाठवली.त्यावर नागरिकांचा राज्य सरकार यावर जनतेच्या बाजूने विचार करील असा विश्वास होता.मात्र या विश्वासाला तडा गेल्याने नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली.सोमवारी भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाने निवासी भागातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर  महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना निवेदन दिले.वाढीव वीज बिलाबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा कार्यालयाला टाळे लावू असा इशारा यावेळी देण्यात आला..

    यावेळी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब. महिला अध्यक्षा मनीषा राणे,डोंबिवली महिला मंडळ अध्यक्षा पूनम पाटील,डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रदीप चौधरी,संदीप शर्मा,सुभाष गोहिल,संतोष शुक्ला, नितेश पेणकर, मोहन नायर,युवा जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई,वर्षा परमार यासह डोंबिवली ग्रामीण मंडळ येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र जमून निवासी भागातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यत महाविकास आघाडी सरकार विरोधातजोरदार घोषणाबाजी केली.यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड भेट घेतली.यावेळी शशिकांत कांबळे म्हणाले,जनतेचा उद्रेक झाल्यास यास वीजवितरण कंपनी जबाबदार असले. फडणवीस सरकार असताना एकदा तरी कंपनी कार्यालयात कोणत्याही पक्षाचा मोर्चा आला नव्हता. कारण त्या सरकार मध्ये जनतेला न्याय ममिळत होता.आताच्या सरकारमध्ये जनतेची लुट सुरु आहे.लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या.आपले पोट भरणे मुश्कील असताना वाढीव वीज बिले कशी भरणार ? या भाजपचा सहावे आंदोलन असून यापुढे जनतेसाठी भाजप मागेपुढे पाहणार नाही.तर डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब म्हणाले, या सरकारला गरिबांची जाण नाही. भाजपा नेहमी जनतेच्या बाजू म्हणणे मांडत असते.लॉकडाऊन मध्ये वीज वीजवितरण कंपनीचे कर्मचारी मीटर रीडिंग घेण्यासाठी आले नसताना कोणत्या आधारावर वाढीव वीज बिले आकारली याचे उत्तर द्या.डोंबिवली ग्रामीण महिला अध्यक्षा मनीषा राणे यांनी वाढीव विजा बिलामुळे कोणी आत्महत्या केली तर याला वीजवितरण कंपनी जबाबदार असेल असे सांगितले. तर मिहीर देसाई यांनी लॉकडाऊनच्या काळात किती मंत्र्यांना वाढीव विज बिले आहेत ते जनतेला या सरकारने जाहीर करावे. अनेक मंत्र्यांची वीज बिले माफ केली मग जनतेला वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित केला. कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी भाजपचे निवेदन वरिष्ठांना देण्यात येईल असे सांगितले.

वाढीव वीज बिलावर शिवसैनिकही नाराज असल्याचा भाजपचा आरोप

 वाढीव वीज बिले सर्व सामान्य जनतेला दिली जात असताना दुसरीकडे वाढीव वीज बिले आली असताना शिवसैनिकही नाराज आहेत असा आरोप भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी यावेळी केला.त्यामुळे सत्ता असल्याने शिवसैनिक जाहीरपणे वाढीव वीज बिलाबाबत आवाज उठवत नसल्याचे अप्रत्यक्षपणे भाजपने सांगण्याचा प्रयत्न केला.तर भाजपाबरोबर सत्ता असताना शिवसेना जनतेसाठी रस्त्यावर उतरू अशी भूमिका घेत होती. मात्र आता शिवसेना हि भूमिका का घेत नाही असा जाहीर प्रश्न मिहीर देसाई यांनी यावेळी केला.  

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!