डोंबिवली ( शंकर जाधव ) : नेहमी समाजकार्यात झोकून घेत समाजातील गोर गरीब लोकांना न्याय मिळवून देणारे सुमित चौधरी यांची भाजप युवा मोर्चा डोंबिवली पूर्व शहर सचिवपदी नियुक्ती झाली आहे. सुमित हे तरुण वर्गात प्रसिद्ध असून तरुणांना बरोबर घेऊन समाजसेवा करत असतात.सदैव लोकांसाठी उभे राहणारे सुमित हे भाजपा पक्षात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात.आमदार रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांची या पदावर नियुक्ती केली.
कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, युवा मोर्चा डोंबिवली पूर्व अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पूर्व महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील, डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष नंदू जोशी,डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्षा मनीषा राणे यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.सुमित चौधरी यांनी भाजपा पक्षाच्या वाढीसाठी सदैव जोरदार प्रयत्न राहीन आणि जनतेच्या न्यायहक्कासाठी काम करत राहीन असे सांगितले