डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाणे जिल्हा पोलिस मित्र डोंबिवली शहर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कोव्हीड योद्धा जितेंद्र आमोणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटल येथील कर्मचारी वर्गासाठी छोटीशी भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे सदर उपक्रमात औपचारिक कारणामुळे हजर न राहता सामाजिक कार्यकर्ते संजय भोईर यांचे अनमोल सहकार्य लाभले.
सदरहू उपक्रमात पोलीस मित्र सचिव श्रीधर सुर्वे, खजिनदार अभिजित माळवदे, पोलीस मित्र व सुप्रसिद्ध कोरिओग्राफर महेश दवंडे, सुप्रसिध्द निवेदक तथा कॉमेडीयन प्रवीण (शिवा)गायकवाड, प्रसिद्ध गायक संदिप कदम व गांधीगिरीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जेल प्रशासनाला संपर्कात घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना प्रशिक्षण देऊन त्याच्यात मतपरिवर्तन घडवून आणणारे एकमेव सुधारक लक्ष्मण गोळे तसेच शास्त्रीनगर हॉस्पिटल मेडिकल मधील फार्मासिस्ट धनेश शिव, सहाय्यक वेदश्री पाटणकर, सोशल वर्कर भगवतीप्रसाद रुंगठा, नामदेव गावित, सतीश महाजन, सत्तरसिंग भांडारी, सचिन कांबळे व इतर अनेक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.