ठाणे

मनोज घरत यांची महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका अध्यक्ष पदी नियुक्ती

डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते तथा आमदार राजु पाटील,कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण,मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष संदिप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने मनोज प्रकाश घरत यांची महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका अध्यक्ष  पदी नेमणुक करण्यात आली.यापूर्वी मनोज घरत यांनी नगरसेवक म्हणून निवडणूक येऊन जनतेची कामे केली.त्यांच्या कामाची दाखल घेत राज ठाकरे यांनी त्यांची डोंबिवली शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.ते आता कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मनोज घरत यांची महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  उत्तम संघटन कौशल्य, लक्षवेधी आंदोलने यामुळे घरत यांनी जनतेची मने जिंकली आहे. घरत यांना कामगारांच्या प्रश्नांबाबत विचारले असता ते म्हणाले,कल्याण-डोंबिवलीतील कामगारांचे प्रश्न खूप आहेत. पालिकेतील घनकचरा व्यवस्थापण विभागात काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नाही.त्यांचे आरोग्य बिघडत असल्याने त्यांच्या आरोग्य विषयक प्रश्न सुटावा याकरता लवकरच पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल.कामगारांचे प्रश्न खूप असून त्यावर आवाज नक्कीच उठवला जाईल.कामगारांच्या समस्येवर मनसे नेहमीच पुढे असते हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!