ठाणे

शूरवीर सैनिकांच्या माहिती देणारे विविसु डेहरा वर्ष २०२१ दिनदर्शिका

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  दिनदर्शिका म्हटल कि आपल्या समोर काही वशिष्ट दिनदर्शिकेचे नाव समोर येते. देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे यासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या आणि शत्रूला नामोहरम करणाऱ्या शूरवीर सैनिकांची माहिती विविसु डेहरा वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेतून मिळणार आहे. हे सैनिक भारतीय जनतेच्या सहाय्यार्थ नेहमीच धावून येतात. नैसर्गिक आपत्तीत आणि देशाच्या शत्रूने, देशावर आक्रमण केले, तर ते परतवून लावण्यासाठी, आपले जवान नेहमीच सज्ज असतात. पाकिस्तान असो अथवा चीन असो दोन्ही देशांच्या सैनिकांच्या मनात आपल्या शूरवीर सैनिकांविषयी दहशत आहे. अशा शूरवीरांच्या प्रति आपल्या मनात आदराचे स्थान असले पाहिजे. त्यांचे शौर्य, त्यांचे बलिदान अनमोल आहे. त्यांचा यथोचित सन्मान करणे आपली भावनिक आणि मानसिक गरज आहे. याची जाणीव सर्व बांधवांना व्हावी हा या दिनदर्शिका निर्मिती मागचा उद्देश आहे. तिन्ही दलांच्या रेजिमेंटची महिती त्यांच्या वीर गर्जनेसह,तिन्ही दलांच्या पूर्वीच्या आणि विद्यमान प्रमुखांची माहिती, परमवीर चक्र, परमवीर चक्र विजेते आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक यांची सचित्र माहिती, दिनदर्शिकेची रंगीत  छपाई आर्ट पेपरवर करण्यात आली असून  ती १४ पानांची आहे असे या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य आहे. अधिक माहितीसाठी  कुणाल सुतावणे 9819504020 , विलास सुतावणे  9833410365 यांना संपर्क करावे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!