ठाणे

ठाण्यात एफ डी ए ची धाड ; पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई

ठाणे, ता ४ डिसें, संतोष पडवळ : विना परवाना पनीर उत्पादनाचा व्यवसाय करणार्‍या शिवम डेअरी फार्म, गाळा नं ५३५, विलास इंडस्ट्रीयल इस्टेट, रामबाग, उपवन ठाणे या ठिकाणी छापा मारुन पनीर सह अॅसेटिक अॅसिड, पामोलीन तेल, मिल्क पावडर व स्किम्ड मिल्क असे ५ नमुने तपासणीसाठी घेऊन एकुण १,६१,६२२ रु. चा साठा जप्त करण्यात आला आहे.

व्यापक जन आरोग्य हितासाठी पुढील आदेशापर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जप्त साठ्यापैकी पनीर व दूध हे नाशवंत असल्यामुळे जमिनीत गाडून नष्ट करण्यात आले.

सदरची कारवाई एफ डी ए आयुक्त अभिमन्यु काळे,कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, अन्न सुरक्षा अधिकारी डाॅ.रा. द. मुंडे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी व्यंकटेश वेदपाठक यांच्या मदतीने पार पाडली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!