ठाणे ता 8, संतोष पडवळ – ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता मोठया प्रमाणावर माहिती राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नळ संयोजन खंडीत करुन, पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप् जप्तीची कारवाई करणे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नांवे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारची मोहिम हाती घेण्यांत आलेली आहे.
मागील पंधरा दिवसांत थकबाकीदारांच्या 350 नळजोडण्या खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्यांत आलेला आहे. तरी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करावे व आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन उपनगरअभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे.