ठाणे 10 : मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ कम्यु]िनकेशन
अॅण्ड जर्नालिझमतर्फे मास्टर्स इन पब्लिक रिलेशनस् या
अभ्यासक्रमासाठी झालेल्या अंतिम वर्षाच्या परिक्षेत ठाण्याच्या गौरी
मिसाळ हिने सर्वेत्तम गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे. गौरी
या अभ्यासक्रमात झालेल्या सर्व सेमिस्टरमध्ये विद्यापीठात प्रथम
क्रमांकावर राहीली आहे. त्याबद्धल तिचे हितचिंतक, पत्रकार आणि
माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील अनेकांनी दूरध्वनीवरुन तिचे अभिनंदन
केले आहे.
गौरी मुंबईच्या रुईया कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मिडीया उच्च
श्रेणीत उतीर्ण झाली आहे. पब्लिक रिलेशनस् ( जनसंपर्क ) या विषयात.
पी.एचडी. करण्याची तिची इच्छा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व
जनसंपर्क विभागीतल एक ज्येष्ठ अधिकारी आणि ठाणे महानगपालिकेचे
माजी उप आयुक्त श्रीकांत मिसाळ यांची ती नात आणि पत्रकार
राजवर्धन मिसाळ यांची कन्या आहे.