ठाणे

माणिक त्रिंबक उघडे यांची डोंबिवली शहर कार्याध्यक्ष पदी निवड


डोंबिवली ( शंकर जाधव ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी माणिक त्रिंबक उघडे यांची कार्याध्यक्ष पदी निवड केली. माणिक उघडे यांच्या निवडीने रिपाई आठवले गटात आनंदाचे वातावरण झाले आहे. उघडे यांच्या सर्वसमावेशक सामाजिक कार्यपद्धतीमुळे पक्ष वाढीस मोठी मदत होईल असे गौरवउद्गार गायकवाड यांनी काढले. पक्षाची ध्येय धोरणे याचा सन्मान करून राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे पक्ष बळकटीचे स्वप्न पूर्ण करा असा सल्लाही गायकवाड यांनी दिला आहे.

उघडे विविध स्तरावर कार्यरत असून त्यांच्या मागे समाजबांधवांचा मोठा रेटा आहे त्यामुळे डोंबिवलीतील सर्वसामान्य घटकांची रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्यास रिपाईला उपयोगी पडणार असल्याची चर्चा उघडे यांच्या निवडीने शहरात सुरु आहे. कार्यकारिणीत सहाय्यक सचिव म्हणून समाधान तायडे यांचीही निवड करण्यात आली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!