ठाणे : रविवार दि.13 डिसेंबर 2020 रोजी, ‘ठाणे महानगर पालिका शिळफाटा ते,मुंब्रा’ याठिकाणी रहात असलेल्या नागरिकांना ‘पिण्याचे पाणी मुबलक’ मिळावे. यासाठी ना.श्री.डाॅ. जितेंद्र आव्हाड साहेब(गृहनिर्माण मंत्री,महाराष्ट्र राज्य),शमीम खान यांच्या हस्ते ‘पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे भूमीपुजन’ चा शुभारंभ ‘नारळ वाढऊन’ करण्यात आला.
हा भुमीपुजनाचा कार्यक्रम दोस्ती टाकी,दिवा शिळ फाटा दोस्ती प्लेनेट,मुंब्रा ठाणे जिल्हा येथे पार पडला.
या कार्यक्रमाला नगरसेविका सुलोचनाताई हिरा पाटील (दिवा प्रभाग क्र.29 चे ठा.म.पा.नगर सेविका) बाबाजी पाटील साहेब(दिवा प्रभाग क्र.29 चे तसेच शानु पठाण सुरमे, मायफुज करीम खान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे विक्रम खामकर (ठाणे शहर,जिल्हा अध्यक्ष) आणि ‘दिवा विभागाचे’ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते मनोज कोकणे (ठाणे जिल्हा, चिटणीस) यांच्या आदेशाने व श्री.निलेश कापडणे(दिवा ब्लॉक अध्यक्ष) यांच्या सहकाराने श्री.सूर्यकांत कदम(दिवा ब्लॉक क्र.27 चे वार्ड अध्यक्ष), श्री.विजय वाघ(दिवा ब्लॉक क्र.28 चे अध्यक्ष) तसेच कार्यकर्ते विजय काथेपुरी,युवक कार्यकर्ते कु.राहुल शिंदे,स्वप्नील जाधव महिला कार्यकर्त्या सौ.पुजाताई मोहिते,सारीकाताई झरेकर,कविताताई पाटील इत्यादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.
ह्या कार्यक्रमाचे नियोजन मा.नगर सेवक,हिरा सिताराम पाटील यांनी केले होते. विशेष म्हणजे भूमीपुजनाचा कार्यक्रम ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या हस्ते ‘नारळ वाढऊन’ करण्यात आला.त्यानंतर अनेक मान्यवरांच्या हस्तेही करण्यात आला. त्यावेळीस हिरा सिताराम पाटील यांनी श्री.सूर्यकांत कदम(दिवा ब्लॉक क्र.27 अध्यक्ष ), श्री.विजय वाघ (दिवा ब्लॉक क्र.28 चे अध्यक्ष) या दोन्ही अध्यक्षांनाही ‘नारळ वाढविण्याचा’ मान दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण हिरा पाटील इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले