ठाणे

शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालिका आयुक्तांना पत्र

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षणपद्धती शिक्षण सुरु आहे. मात्र ऑक्टोबर पासून अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असून हळूहळू दैनदिन जीवन पूर्वपदावर येत आहे.अश्या वेळी मॉल,दुकाने,लग्न सभारंभ,मंदिरे,खेळ, जिम इतकेच नव्ह तर बसेस आणि लोकलहि सुरु झाल्या.परंतु शाळेची घंटा वाजली नाही. इयत्ता ८ वीत शिकत असलेले डोंबिवलीतील  वेदांत निलेश कुलकर्णी, ओजस प्रभू , प्रणव सांरभ तीन विद्यार्थ्यांनी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

पालिका आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांना आमचे म्हणणे राज्य सरकारला कळवा, शाळा लवकर सुरु करा अशी विनंती केली.विद्यार्थ्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हणले आहे कि, आमची मागणी सरकारपर्यत पोहचावा,आमची शाळा सुरु करा,खूप जणांचा याला विरोध असेल पण ज्यांना शिकायचं आहे त्यांचीसाठी तरी शाळा सुरु करा.आम्ही सर्व नियम पाळू मस्ती करणार नाही.विशेष या पत्रात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणामुळे आपल्या आरोग्यास धोका बसण्याची शक्यता वर्तवत डोळे, कान आणि  डोके दुखत असल्याचे सांगितले.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!