डोंबिवली ( शंकर जाधव ) : २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी बेडरूमच्या सिलिंग फॅनला नायलाॅन दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १४ तारखेला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय दिनकर पाटील असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.जुनी डोंबिवली येथील गिरजामाता मंदिरजवळील मधुपुष्प्प बिल्डींग मध्ये सदर घटना घडली.त्यांची पत्नी हर्षदा पाटील यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
डोंबिवलीतील तरुणही गळफास घेऊन आत्महत्या..
December 15, 2020
19 Views
1 Min Read

-
Share This!