डोंबिवली ( शंकर जाधव ) : येथील फडके रोडवरील बँक ऑफ बडोदा मध्ये चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरट्याचा प्रयत्न फसलाअसून अज्ञात चोरट्याच्या विरोधात डोंबिवली र्मान्ग्त पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १४ तारखेला सकाळी अडीच ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने बँकेच्या बाहेरील ग्रील तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. बँक मॅनेजर छाया नायर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकाराबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि.सचिन सांडभोर यांना विचारले असता बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.चोरट्याने ग्रील तोडून आत जाण्याच्या प्रयत्न केल्याचे फुटेज मध्ये दिसत असल्याचे सांगितले. तर पुढील तपास पोउपनिरीक्षक डी.एल.दाभाडे करत आहे.